Nojoto: Largest Storytelling Platform

निष्पर्ण मी जाहलो आजजरी विहरले कैक इथल्या फांदीवरी

निष्पर्ण मी जाहलो आजजरी
विहरले कैक इथल्या फांदीवरी
घरटी बांधून संसार थाटला
प्रेमाचा झरा नाही आटला
विहंगणाऱ्या साऱ्यांचा साक्षी
फांदीवर पक्ष्यांची सुबक नक्षी
थबकून नेहमी मला पाहायचे सारे
सोसाट्याचे वाहत असे जरी वारे
अनेकांच्या आठवणींचा मी सोबती
दूरदूरवर पसरे माझी ख्याती 
आताशा फिरकतही नाही कोणी
पुरेसे नाही खत आणि पाणी
भार सोसवत नाही फांद्यांचा
वाट बघतो पानगळ होण्याचा
नाही बहरलो कित्येक दिवसांत
भिजायला नाही मिळत पावसात
अश्रुंनाही वाट केली मोकळी
पुढे भरुन निघेल का पोकळी
आता दिवस उरलेत फक्त चार
सुकलेल्याला पालवी कशी फुटणार ?

©Sujata Bhalerao
  #Sukha  #जीवनगाणे# गातच राहावे

#Sukha #जीवनगाणे# गातच राहावे #जीवनअनुभव

27 Views