आपल्या आयुष्यातील ती म्हणजे कुणी एक नाही, तर ती च्या रुपात त्या अनेक आहेत. ती चे सर्वात पहिले रूप म्हणजे "आई" ती आहे म्हणून मी ह्या जगात आहे, आई नाही तर काही नाही हेच खरे आहे. दुसरे रूप म्हणजे "बहीण" लहानपणापासून आपल्यासोबत खेळण्यासाठी, दंगा मस्ती करण्यासाठी खास सोबतीण. तिसरे रूप म्हणजे "बायको" सहचारिणी, आपल्या आयुष्यात आईप्रमाणे आपली काळजी घेणारी, प्रत्येक सुखदुःखात खंबीरपणे पाठीशी उभी राहणारी ती. ती आहे म्हणून घरसंसाराला आकार आहे, तिच्या सोबतीनेच होती स्वप्ने सर्व साकार आहे. चौथे रूप म्हणजे "मुलगी" आहे ती आहे म्हणून पुन्हा एकदा बालपण जगून घेण्यास आलेली एक संधी आहे. तिच्या असण्यानेच जीवन आनंदमय नि प्रकाशमय आहे. अशा एक ना अनेक रुपातील माझ्या आयुष्यातील ती ला आज जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. योगेश आ आ ✍️ सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे ती आहे म्हणून.. #तीआहे वाय क्यु टिम कडुन सर्वं ताईंना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine