_#कवी'धनूज. भावभोळा हरी (अभंग*) भावभोळा हरी । उभा विटेवरी । कर कटेवरी । श्री श्रीहरी ।।०१।। क्षणाक्षणां ध्यान । तुझे रे केशवा । तुझाच माधवा । देह माझा ।।०२।। उभा वारकरी । देह दिधलासी । खड़ा ठाकलासी । भक्तजना ।।०३।। हरी हरी घोष । मनी रात्रंदिनी । संत शिरोमणि । तू विठ्ठला ।।०४।। तुझ सम सारे । रंजले गांजले । मज् जवळीले । बां विठ्ठला ।।०५।। भावभोळे रुप । अनंत ते कोटी । नाम घोषओठी । हरी हरी ।।०६।। वाहिला हां देह । भयमुक्त श्राप । तूच मायबाप । अनंताचा ।।०७।। -लेखक'कवी- (धनंजय संकपाळ) #धनूज | रंग मनाचे. #अभंग