प्राजक्ताची चाहूल पाडी मनाला भूल। लोचने सुखावीती सुगंध पसरविती। अंगणी सडा पाडुनी भास्कराचे स्वागत करिती। सुकुमारिका फुले वेचिती करुनी माळा केशिकांत माळीती। वाटसरू सुगंधाने दारात थांबती आतिथ्य त्यांचे माझ्या हातून घडविती। नमसकार मित्रहो, आजचा विषय आहे..प्राजक्ताची चाहूल तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा कृपया कविता कमीत कमी १० व जास्तीत जास्त १६ ओळींची लिहा.. #yqkavyanand हा हॅश टॅग अवश्य ठेवा. #yqmarathi #yqtaai