असे वाटते उडत राहावे उडताना मला कोनिणा पहावे त्या टीव्हीतल्या डोरेमोन सारख उडून सारे शहर फिरावे.... असं वाटते उडत राहावे फुलपाखरू होऊन बाग फिरावे त्याचे काही रंग घेऊन जीवनही रंगून जावे.... असे वाटते उडत रहावे पाखरू होऊन रान फिरावे पाहता सौंदर्य वनाचे मन गहिवरून यावे.... असे वाटते उडत रहावे सारंग होऊन जग फिरावे पाहता साऱ्या डोंगर दऱ्या छोटे छोटे ते क्षण टिपावे असे वाटते उडत राहावे उडताना मला कोनिणा पहावे.... असे वाटते उडत राहावे उडताना मला कोनिणा पहावे..... लहान असताना लीहलेली एक कविता....आवडली तर नक्की सांगा.....😉