कात्यायनी माता स्तुती त्वं महर्षि कात्यायन पुत्री प्रत्यक्ष कात्यायनी माता l अद्भुत शक्ती अंतरी त्वं साक्षात दुर्गा माता ll१ll ब्रम्हा, विष्णु, शिवांशिनी चतुर्भूज धारीनी l त्वं महिषसुरमर्दिनी अमोघ फल दायिनी ll२ll अलौकिक तेजस मुख मंडल कामलपुष्प, तलवार हस्ती सुशोभित l एक हस्त वरद मुद्रेत एक हस्त अभय मुद्रेत स्थीत ll३ll उपासना तुझी माता जे जे करतात मनोभावे l अर्थ,धर्म,काम,मोक्ष चार फल निश्चित पावे ll४ll वर प्राप्ती मनोवांच्छित तव आराधना निश्चित l त्वं ब्रजमंड अधिष्ठात्री श्री हरी वर मिळवा म्हणून -गोपिका तुझीच आराधना करत ll५ll लाल रंगात तू शोभती अंबे तू साक्षात ग पार्वती l सिंह तुझं वाहन भक्तांना तू पावती ll६ll ✍️ प्रियंका सोनवणे