गुंता आयुष्याचा सोडवावं म्हणलं मग एक-एक गणित मांडत गेलो प्रत्येक वळणाचा graph काढला आराखड्याची अंमलबजावणी केली समीकरणे सखोल पाहिली समिकरणांची उकल काढली प्रमेयांची सत्यता पडताळली सिद्धांतांनी गोची केली नियमांशी संधी केली सगळ्यात माजुऱ्या भूमीतील वाकवलं हवे तसे आकार दिले गणितांची मांडणी अगदी आखीव-रेखीव झाली अन, साऱ्या गणितांना एका पटलावर आणलं अवाक झालो, बेफिकीर झालो, बेमालूम उधळलो, शोधाशोध झाली उत्तरांची माझा आनंद मिळाला, आपल्या नात्याचं गणित मांडलेल्या, हातभरून रंगलेल्या, तुझ्या मेहंदीत…. हातभरू रंगलेल्या, तुझ्या मेहंदीत….