Nojoto: Largest Storytelling Platform

गृहप्रवेश गृहप्रवेश करुन सायली घरात आली खरी पण क

 गृहप्रवेश 
 गृहप्रवेश करुन सायली घरात आली खरी पण काहीशा गोंधळलेल्या अवस्थेतच. आई लहानपणीच गेलेली, बाबा आणि ती.. एवढाच परिवार.. आणि आता या एकत्र कुटूंबात सामावून जायच्या कल्पनेनेच ती बावरली होती. वडीलांच्या कडक शिस्तीत वाढल्याने ती हुशार, प्रत्येक गोष्टीत निष्णात पण काहीशी शिष्ट झाली होती. दिसायला सुंदर, सुसंस्कारी, क्लास वन ऑफिसर असलेली सायली सर्वांनाच आवडली होती. नाही म्हणायला नात्यातल्या काही बायका सुमतीताईंना म्हणाल्या, "बघा हो, आईविना वाढलेली पोरगी आहे. आणि असंही ऐकलं आहे की भलतीच शिष्ट आहे. फारशी मिसळत नाही कुणामध्ये." सुमतीबाईंनी दुर्लक्ष केलं, उलट मनात असाच विचार केला की आपल्या पोटी मुलगी नाही. एवढंच काय…  मागच्या तीन पिढ्यात मुलगी जन्माला आली नाही. सायलीला पोटच्या मुलीचं प्रेम देता येईल. जीव लावला की रुळेल आपोआप.
 नव्या नवलाईचे काही दिवस सरले तरीही सायलीचे सूर अद्याप सर्वांसोबत जुळले नव्हते. सासू-सासरे, धाकटा दीर, नवरा आणि ती असं छान पंचकोनी कुटंब… पण ती जरा अंतर राखूनच होती. म्हणजे ठरवून असं नाही पण तिला माणसात वावरायची, व्यक्त होण्याची सवयच नव्हती. घरातले देखील तिच्याबद्दल ऐकलेल्या तिच्या शिष्ट स्वभावामुळे आणि तिच्या अधिकारी पदाला थोडे घाबरुनच होते. घरातल्यांचा प्रेमळपणा, त्यांची काळजी तिला पदोपदी जाणवत होती. तिलाही या सगळ्याचा भाग व्हायचं होतं, पण सुरुवात कुठून करावी, हे कळत नव्हतं. 
 एकदा तिच्या ऑफिसमध्ये कामाच्या निमित्ताने तिच्या सासऱ्यांचे मित्र आले. ते सांगत होते… "तुझा सासरा फार कौतुक करतो बरं का तुझं. तुला म्हणे राजकारणाचं फार ज्ञान आहे. तुम्हा दोघांची ही आवड छान जुळते. त्याला फार अभिमान वाटतो तुझा." सायली मनोमन सुखावली आणि मग तिला कळलं चहाच्या वेळी सासऱ्यांच्या तिथे रेंगाळण्याचं कारण. घरी आल्यावर गेटमध्ये शिरत असतानाच शेजारच्या विमल काकू आणि आणखी एक-दोघी जणी आल्या. त्यांनीही तिच्या हातच्या गुलाबजामचं फार कौतुक केलं.  सुमतीताईंनी आवर्जून सुनेने बनवलेले गुलाबजाम सगळ्यांनी दिले होते आणि म्हणाल्या होत्या "तिला स्वयंपाकातले सगळे बारकावे माहित असतात. तिने साधी मटार-फ्लावरची भाजी केली तरी चविष्ट होते." सायलीला कळलं सासूबाईंच्या आसपास असण्याचं कारण आणि त्यांचं कौतुक. एक-एक भिंत आता गळून पडत होती. दरवाजा उघडून घरात जात असतानाच घरात चाललेली चर्चा कानावर आली. आई प्रशांतला म्हणजे तिच्या धाकट्या दिराला त्याच्या बायकोविषयी अपेक्षा विचारत होत्या. तेव्हा तो म्हणाला, "तू नको काळजी करु. माझी वहिनी शोधेल माझ्यासाठी मुलगी. अजून जास्त बोलत नाही माझ्याशी. पण बघ थोड्याच दिवसात ती माझी छान मैत्रिण होईल." आणि सायलीला जाणवली आपल्या आयुष्यात असलेली मैत्रीची पोकळी. आता मात्र शिष्टाचाराच्या सगळ्या भिंती गळून पडल्या होत्या. 
 घरात येताच तिने सगळ्यांसाठी छान चहा केला. बाबांना चहा देत त्यांच्या जवळच बसून म्हणाली, " मग बाबा, विधानसभेचं वारं कोणत्या दिशेने वाहतंय?" तशी बाबांची कळी खुलली. किती तरी वेळ दोघे गप्पा मारत होते आणि सुमतीताई दोघांकडे कौतुकाने पाहत होत्या. तशी सायली म्हणाली, "आई, उद्या जरा उशीरा जायचं आहे ऑफिसला.. छान बासुंदी पुरीचा बेत करु.." सुमतीताईंना आश्चर्याचा धक्काच बसला. त्यातून त्या सावरल्याही नव्हत्या की सायलीने त्यांना हाताला धरुन शेजारी बसवून सांगू लागली, "आई पुऱ्यांची कणीक मळताना ना त्यात थोडी पिठीसाखर घालायची… पुऱ्या छान खुसखुशीत राहतात.." सुमतीताईंचं तिच्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं.. त्यांचे डोळे आनंदाश्रूने भरुन आले होते. गेले कित्येक दिवस त्या अशा संवादाची वाट पाहत होत्या.  रात्रीच्या जेवणानंतर ती स्वत:हून प्रशांतच्या खोलीत गेली आणि तिच्या आयुष्यातली मैत्रीची पोकळी भरुन काढण्यासाठी पुढाकार घेतला. 
 प्रशांत आणि ती जेव्हा खोलीतून बाहेर आले तेव्हा तिचे सासू-सासरे आणि नवरा तिची वाटच पाहत होते. नवऱ्याने सायलीला सांगितलं, "उद्या मी सुट्टी घेतोय.. तुलाही जमतंय का बघ.. छान फॅमिली टाईम एन्जॉय करु.." सायलीने लगेच होकार दिला. तिलाही लहानपणापासून जगायचे राहिलेले क्षण अनुभवायचे होते.. सगळे लाड, हट्ट पुरवून घ्यायचे होते. सायली सर्वांना म्हणाली, "आजपासून मला सायली नको, सई म्हणा.. मला आठवत नाही पण बाबा सांगत होते… माझी आई मला सईच म्हणायची.." तसे सुमतीताईंचे डोळे पाणावले.. त्यांना वाटलं.. नात्यांना वेळ दिला की ती फुलतात.. बहरतात.. फक्त त्याला वेळोवेळी प्रेमाचं आणि कौतुकाचं खतपाणी घालायला हवं.. या घराला आज सून, मुलगी आणि मैत्रीण मिळाली होती.. त्यांनी नजरेनेच सायलीची दृष्ट काढली.  आज खऱ्या अर्थाने तिचा गृहप्रवेश झाला होता📝✒️✍️sandy✍️

sandyjournalist7382

sandy

New Creator