आयुष्याच्या या तरल संध्याकाळी सागर किनारी लाटांवर स्वार होऊन त्या बुडणाऱ्या सुर्याला बघतांना एक खंत मात्र मनात सलते तुझा हात माझ्या हातात असता तर त्या सुर्याला मुठीत घेऊन थिरकली असती त्या लाटांसमवेत मनसोक्त, तुडुंब ओलेशार होईपर्यंत आणि विसावले असते मिठीत तुझ्या गर्भरेशमी आलिंगन होऊन एक दीर्घ उसासा जड श्वासाचा निश्चल मनाने सांगून जातो सगळे आहे माझ्यापाशी पण एक पोकळी आहे अशी जी कधीच भरून निघणार नाही कारण.....फक्त तू नाहीस म्हणून..... शुभ संध्या मित्रहो आजचा विषय आहे फक्त तू नाही.. चला तर मग लिहा पटापट. #फक्त_तु #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला सुद्धा भेट द्या. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai