#तव कुशीत विसावते# प्रीतभाव व्यक्तताना सख्या अव्यक जरी मी राहते, स्पर्श होता तुझा लाडका तव कुशीत मी विसावते..१ मोहिनी तुझी व्यापृत मनी गंध देही या तुझाच तो, होऊन राधा तुझीच कान्हा श्वास आवर्तनी तू राहतो..२ अशी खुमारी तुझ्या प्रीतीची पल्लवते बघ तनामना, धुंद होते रे रासरंगी ध्यासात नित्य तव मोहना..३ भान नुरले तव विना कसले लय श्वासांची तुझ्यात गुंतली, राधा मोहन एकरूप दोघे अस्तित्व प्रीतरूपे भूतली..४ चिरंजीव प्रीत या जगी भावरूप इथे चराचरी, उच्चारता ही प्रीतनाम दिसे राधिका नि श्रीहरी..५ रोहिणी तुज कुशीत विसावते प्रीतभाव व्यक्तताना सख्या अव्यक जरी मी राहते, स्पर्श होता तुझा लाडका तव कुशीत मी विसावते..१