तुझं आहे तुझपाशी इतरांची अपेक्षा कां धरावी नको खचू जराही.... कशाला करतेस,उगाच मन हे उदास एकदा पंखात बळ एकवटुनी,घे भरारी गगनी.... स्त्री जन्माचा होउदे साक्षात्कार स्वतःच सुख शोधत दे कर्तुत्वाला तुझ्या झळाळी... येईल दिवस तुझाही एक ना एक दिवस नक्कीच उगाच दुसऱ्याची अपेक्षा बाळगूनी नको होऊ मनी उदास.... तुझ्या सुखाची चावी तुझ्याच मुठीत ग बाई जरा बघ एकदा डोळे उघडून दिसेल सुख तुलाही तुझं आहे तुझपाशी मग कशाला शोधतेस, "तुझ्यातच दडलेले सुख....! ©Komal #स्त्रीविशेष... #WalkingInWoods