*दशाक्षरी काव्यरचना.* *मेघ दाटले....* *मेघ दाटले काजळ काळे* *मनी हर्षाचे झुले उमाळे* *मोर पिसाचे फुलले डोळे* *मातीचाही गंध दरवळे* *वाट पाहिली चातकापरी* *अलवार येती मृगसरी* *तनां-मनां या भिडल्या धारा* *सूर अवचित ओठावरी* *थेंब नाचे टपटपणारे* *खळखळ नादे जळभारे* *अवखळ चंचल हे वारे* *सृजनाला ये उधाण सारे* *बीज अंकुरे धरणी पोटी* *येती जुळूनी मीलन गाठी* *साज मखमली झऱ्या काठी* *इंद्रधनू मग येई भेटी* *पानोपानी छटा उमटल्या* *गर्द पोपटी हिरव्या ओल्या* *बहरून आल्या नभांगणी* *घन सावळ्या हरिणी न्हाल्या* ©Shankar kamble #पाऊस #पाऊसधारा #पाऊसाततुझीआठवण #पाऊस_पडून_गेल्यावर #पाऊसाला #थेंब #थेंबाचे #सरी