#OpenPoetry *व्यथा बळीराजाची* नाही आभाळात पाणी करपले पिक उष्माघाताने उरले फक्त डोळ्यात पाणी तेही शोषले सरकारने. शाळा हाय पोट्टयाची कस धाळन त्याले पैसे नाही हाताशी कसा शिवण मनीला त्याले. यंदा लगन हाय पोरीचं कसं पाठवन पोरीले घर ते कास्तकारच पण दाना नाही जेवाले. बाजूच्या सायबाच्या घरून भाकरीचा वास येते सांगाले पाह्य तुयाच पिकवली जवारी उपाशी बी तूच सांग तुया देवाले. आयुष्यभर झटूनही ना रिटायरमेंट ना पेन्शन त्याले उद्या कुठून आणण भाकर विचारानं डोया नाही डोयाले. नाही समजणार त्याची हि व्यथा हो कोणाले जिवंतपणीच जमिनीच्या भेगा पाहून मरण येते त्याले ✒समृद्धी सावरकर अमरावती बळीराजा