#प्रेम नावाचा गेम.... प्रेम निःशब्द शब्दांनाही न सापडणारं प्रेम मौनातुनही संवाद साधणारं प्रेम मनीचं गुपित अगदी सहजपणे कुणालाही न उलगडू देणारं प्रेम भावनिक स्पर्शालाही सहजपणे न कळणारं प्रेम जीवन मरणानेही न संपणारं प्रेम एक हळूवारपणाची आठवण जिवलग माणसाशी ह्रदयात केलेली कोमल अशी साठवण प्रेम नसते कापरासारखे झुर्रकन उडून जाण्यासारखे प्रेम असते अत्तरासारखे आयुष्यभर दरवळत रहण्यासारखे प्रेम उमलत्या दिशा अन् त्या दिशांचा अस्त प्रेम अमाप सुखांचा सुकुमार असा दस्त प्रेम दारात उमललेली चाफ्याची मंजिरी प्रेम हृदयात खुललेली बकुळकळ्यांची बाग न्यारी प्रेम हृदयातील एक आगळीवेगळी भावना कुणाला कळलेली..कुणाला कळून न कळलेली.. कुणाला कळताना जुन्याच लाखो प्रश्नांची उकल नव्यानं देत गेलेली.. कुणी पहिल्याच भेटीत उघड केलेली..कुणी आयुष्यभर लपवलेली.. कुणी गंमत करण्यासाठी वापरलेली..कुणाच्या आयुष्याची गंमत झालेली.. कुणाचे आयुष्य उभारणारी..कुणाला आयुष्यातुन उठवणारी.. फक्त एक निरागस भावना.... @शब्दवेडा किशोर ©शब्दवेडा किशोर #गोष्टी_तुझ्या_माझ्यातल्या #गोष्ट_एका_प्रेमाची