ती..... मायाळू , ती....सोज्वळ, ती... दिवसभर राबराब राबणारी, ती... सर्वांना सुखी ठेवणारी, ती... सर्वांच्या सुख, दुःखात सहभागी होणारी, ती... संकटात सदैव पुढाकार घेणारी, ती... स्वतः दुःखी असली तरी चेहऱ्यावर तेजस्वी हास्य ठेवणारी, ती... प्रत्येकाला एकसमान मानणारी, ती... कोणताही स्वार्थ न बाळगणारी, ती... संपूर्ण घर सांभाळणारी, ती... दगडाच्या चार भिंतींना घराचं घरपण देणारी, ती... स्वतः उपाशी राहून आपल्या चिमुकल्यांना खाऊ घालणारी, तिचा वर्ण कोणताही असला तरी मूर्ती मात्र सदैव उंचावर असणारी, तिच्याविषयी बोलतांना, लिहिताना शब्द अपुरे पडावेत अशी तीची महती, तीचाविना श्रीमंतांचा श्रीमंत ही भिकारी जगाची जननी, माझी पहिली हाक "माझी आई " #माझी आई#nojoto