......आहेच ती जगात भारी गेले दोन तीन दिवस 'ती'च्या आठवणीत रमल्यामुळं ,सहज भुतकाळात फेरफटका मारल्याचा भास झाला.टाईम मशीन खरोखर अस्तित्वात येईल एव्हढे परफेक्ट दिवस आठवु लागले.अगदी एखाद्या दिग्गज लेखकानं कादंबरी लिहिल्यावर जस वाचकाच्या डोळ्यासमोर चित्र उभ राहत ,तसं दिवस आठवले.बारावीत असताना माझ्या वर्गातल्या मुली मला 'MG' म्हणजे महात्मा गांधी म्हणायच्या असं मला माझ्या बहिणीनं सा़गितल कारण तिच्या मैत्रिणीची बहिण माझी क्लासमेट होती.त्याला कारण म्हणजे माझा पेहराव 'बदामी पंचा' आणि 'कोल्हापुरी चप्पल' मला पुर्ण 'स्वदेशी' करून ट