Nojoto: Largest Storytelling Platform

भाऊ रक्ताच्या नात्यात एक नातं असंही असतं, खरचटलं

भाऊ

रक्ताच्या नात्यात 
एक नातं असंही असतं,
खरचटलं जरी एकाला
 तर दुसऱ्याला सहन होत नसतं..
लहानपणापासून एकमेकांना
जीवापाड जपलेलं असतं पण 
भाडंल्याशिवाय त्याच्याशी 
करमत सुद्धा नसतं..
आयुष्यात भावाच स्थान खुप महत्त्वाचं असतं ||1||

प्रत्येक अडचणीत साथ खंबीर देतं
हमखासपणे एकमेकांच्या उणीवा दुर करतं
कधी देऊन मिठी प्रेमळ,
तर कधी घट्ट हात पकडुन ठेवतं
कधी रागावून तर कधी दोन मारुन समजावतं
हे असंच काहीसं चालत आलेलं असतं
आयुष्यात भावाच स्थान खुप महत्त्वाचं असतं ||2||

काही नाती मात्र रक्ताची नसतात
वेळ पडल्यास आपल्यासाठी रक्तही सांडतात
रक्ताच्या नात्यालाही लाजवतील
 अशीच काहीशी साथ जन्मभर देऊन जातात..
चुकलं जरि कुठं तर नकळतच त्याची दुरुस्ती करून घेतात..
खरंच भावासारखे मित्र मिळणे असावे लागते नशिबात ||3||

मग कुणाच्या तरी आयुष्यात भाऊ मात्र नसतात,
साथ देण्या भावाची,बहिणीच्या स्वरुपात साक्षात भगवंतच अवतरतात..
मग कधी छळणं एकमेकांना,तर कधी चिडवणं,
कधी हसवणं,तर कधी रडवणं असंच काहिसं घडत असतं..
भावाची उणीव भरून काढण्यासाठी बहिणीचा हात मात्र पाठिवर असावा लागतं...
खरंच आयुष्यात भावाच स्थान खुप महत्त्वाचं असतं. ||4||
                    
                                               ‌.                                -विशाल पंडित © #भाऊ....