Nojoto: Largest Storytelling Platform

#कसे कळावे.. अंधाऱ्या रातीस या कसे कळावे तळमळणे म

#कसे कळावे..

अंधाऱ्या रातीस या कसे कळावे तळमळणे माझे
एकांतामधील तळमळत्या मनाचे उदास जळणे माझे
कित्येक कडू गोड आठवणींचा बाजार हा भरलेला
विरह वेदनेत कुण्या आपल्या शिवाय होरपळणे माझे
होऊनच चेततो हृदयी पेटता अंगार क्षणाक्षणाला
समजावे तरी त्यास कसे धगीतले ते शेकणे माझे
जळता जळता राख होते माझ्या मनाची ती कुणा कळेना
मनही जाणते हेच असे आता शेवटाला उरले जगणे माझे
सांगावे कुणास अन् हल्ली बोलावेही मी कुणाशी
बहुदा सारे वेगळेच होऊ लागलेय वागणे माझे
आता गर्दीतला हा एकांत आवडतो मजला
मी एक शापीत जोकर जगाला दाखवी
माझ्या हसऱ्या जगण्यातुन अवघड असे अस्तित्व माझे
@शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #कसे_कळावे_जगास_शापीत_जीणे_माझे