Nojoto: Largest Storytelling Platform

बापू काल माझ्या स्वप्नात बापू आले हळूच मल

बापू
        
काल माझ्या स्वप्नात बापू आले
हळूच मला गोंजारले
लाडाने माझ्या टपलीत मारले
तसा मीही ताडकन उठलो
बापूंना पुढ्यात पाहून दचकलो
क्षणात त्यांच्या चरणी नतमस्तक झालो
मला बापू दिसले...
आमची चिंता असलेले, तरीही थकलेले
भिंतीवरील त्यांच्या फोटोकडे ते पाहत राहिले
मनातल्या मनात हसत राहिले..
बापूंचा चेहरा सुकलेला दिसला
आमच्या दुःखाचा त्यावर जणू डोंगर दाटला
त्यांचा चष्माही आता काळवंडला
आणि आमचे 'खरे' चेहरे ओळखण्यास फसला
आणि हे काय ,बापूंच्या हातात काठी दिसली
पण मळकट, आणि पूर्ण थकलेली
आम्हाला सरळ करता करता स्वतःच  वाकली
बापूला तिने सत्य मार्ग दाखवला
आम्ही त्या काठीने सत्याचा गळा घोटला
बापूंचा पंचा ही पार झिजला
गोळामोळा झाला , धागा धागा विरला
त्यातला शुभ्र पांढरा रंग तर कधीच उडाला
त्यावर आम्ही आता काळा रंग फासला
आता मीही क्षणभर बावरलो
श्वास रोखून पाहू लागलो
मनातच  बापूला शोधू लागलो
खरे बापू कोणते?? 
आपण नोटांमध्ये बंद केलेले
भिंतीवर धूळ खात पडलेले
पुस्तकांच्या पानात हरवलेले की आता स्वप्नात आलेले... bapu
बापू
        
काल माझ्या स्वप्नात बापू आले
हळूच मला गोंजारले
लाडाने माझ्या टपलीत मारले
तसा मीही ताडकन उठलो
बापूंना पुढ्यात पाहून दचकलो
क्षणात त्यांच्या चरणी नतमस्तक झालो
मला बापू दिसले...
आमची चिंता असलेले, तरीही थकलेले
भिंतीवरील त्यांच्या फोटोकडे ते पाहत राहिले
मनातल्या मनात हसत राहिले..
बापूंचा चेहरा सुकलेला दिसला
आमच्या दुःखाचा त्यावर जणू डोंगर दाटला
त्यांचा चष्माही आता काळवंडला
आणि आमचे 'खरे' चेहरे ओळखण्यास फसला
आणि हे काय ,बापूंच्या हातात काठी दिसली
पण मळकट, आणि पूर्ण थकलेली
आम्हाला सरळ करता करता स्वतःच  वाकली
बापूला तिने सत्य मार्ग दाखवला
आम्ही त्या काठीने सत्याचा गळा घोटला
बापूंचा पंचा ही पार झिजला
गोळामोळा झाला , धागा धागा विरला
त्यातला शुभ्र पांढरा रंग तर कधीच उडाला
त्यावर आम्ही आता काळा रंग फासला
आता मीही क्षणभर बावरलो
श्वास रोखून पाहू लागलो
मनातच  बापूला शोधू लागलो
खरे बापू कोणते?? 
आपण नोटांमध्ये बंद केलेले
भिंतीवर धूळ खात पडलेले
पुस्तकांच्या पानात हरवलेले की आता स्वप्नात आलेले... bapu