बहीण पाठीराखी सर्वांत मोठी बहिण भारती तिच्या पाटची मिना नांव तिचे मधला लाडोबा मीच बरका ज्योती, छाया नांव शेवटचीचे ||१|| उसतोडीला जायच्या मोठ्या दोघी शाळा सातवीत सुटली कायमची आम्ही तिघे होतो आजीसोबत गावी लहानी स्वयंपाकात मदत करायची ||२|| भाऊ लाडका होता त्या चौघींचा खाऊची वाटणी होती माझ्याकडे खेळणी घे पण शाळा शिक म्हणायच्या दुखल्यावर घालायच्या देवाला साकडे ||३|| बापाचा आधार दैवाने अर्ध्यात नेला आईला हातभार बहीणींनी दिला माझ्या शाळेचा खर्च मजुरीत केला लग्नासाठी होती पुण्याई गाठीला ||४|| हट्ट नाही राखीला, ना भाऊबीजेला सुख लाभू दे म्हणातात भाऊ तुला माझं हे अस्तित्व आहे त्यांच्या मुळे या चौघी बहीणींच पाठीराख्या मला ||५|| कवी गीतकार पंडित निंबाळकर मु पो सांगवी भुसार ता कोपरगाव जि अहमदनगर ७९७२५२३७१७ ©Pandit Nimbalkàr #panditnimbalkar, #rakhi #DearCousins