चला उठा समस्त बांधवांनो वाटचाल करूया एका नव्या युगाकडे.... जिथे असेल फक्त जिव्हाळा, प्रेम एकमेकांबद्दल आपुलकी, नसेल तिथे कोणतेच हेवेदावे, ना कोणी विरोधी,ना शत्रू...... करूया वाटचाल एका अशा जगाकडे जिथे 'स्त्री' असेल स्त्रियांचा आदर, करूया वाटचाल..... नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनों आज महाकवी वामनदादा कर्डक यांचा स्मृतिदिन आहे. आजचा विषय आहे त्यांच्या प्रसिद्ध काव्यसंग्रहाचे शीर्षक.. वाटचाल.. #वाटचाल चला तर मग लिहुया आणि त्यांच्या बद्दल थोडं जाणुन घेऊया. वामन तबाजी कर्डक (१५ ऑगस्ट, इ.स. १९२२ - १५ मे, इ.स. २००४, वामनदादा कर्डक नावाने प्रसिद्ध, हे मराठी शाहीर, कवी आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते होते. त्यांच्या हयातीतच त्यांचे चार काव्यसंग्रह प्रकाशित झाले होते. कर्डकांनी डॉ. आंबेडकरांवर १०,००० हून अधिक गीते रचली आहेत.