Nojoto: Largest Storytelling Platform

कठीण कठीण कठीण अवघा, नश्वर हा प्रपंच ऐका, क्षणात व

कठीण कठीण कठीण अवघा,
नश्वर हा प्रपंच ऐका,
क्षणात विरुनी जाईल देखा,
जपी रे जीवाला। 

चंचल हे पळ विश्व सारे,
भरुनी ओंजळीचे फेरे,
निमिष मात्र कधी न स्थिरे,
विचारी मनाला।

ज्याचे हाती दिली तू दोरी,
तो बनवी तुज कळसूतरी,
नाचवी आपुल्या मनापरी,
सांभाळी स्वतःला।

होते काय झाले काय,
सरते सारे सरणापाय,
शंकर एक बापमाय,
भजी रे शिवाला। #जीव #शिव #प्रपंच #yq_gns
कठीण कठीण कठीण अवघा,
नश्वर हा प्रपंच ऐका,
क्षणात विरुनी जाईल देखा,
जपी रे जीवाला। 

चंचल हे पळ विश्व सारे,
भरुनी ओंजळीचे फेरे,
निमिष मात्र कधी न स्थिरे,
विचारी मनाला।

ज्याचे हाती दिली तू दोरी,
तो बनवी तुज कळसूतरी,
नाचवी आपुल्या मनापरी,
सांभाळी स्वतःला।

होते काय झाले काय,
सरते सारे सरणापाय,
शंकर एक बापमाय,
भजी रे शिवाला। #जीव #शिव #प्रपंच #yq_gns