सर्वांवर प्रेम करायचं असतं...सर्वांशी आपुलकीने वागायचं असतं रे! जगण्याच्या वाटेवर भेटतात अनेक माणसं त्या सर्वांना आपण आपलं समजायचं असतं. जी भेटली, ती सर्व आपली माणसं; पण कोण आपलं नाही, हे सांगणे मला तरी अवघड! काही जातात निघून त्यांना हवं तिथे,पण त्यांच्यासाठी रडून आणि कुढून होणार काय? ते निघून गेले म्हणून काही फरक पडणार नाही पण त्यांच्यात गुंतलात तर आयुष्य निघून जाईल... मग ते परके झाले म्हणून राग आणि पश्चाताप करण्यापेक्षा, त्यांच्याबद्दलचं प्रेम मनात ठेऊन स्वतःच आपली राख उधळीत जाणे केव्हाही चांगलं.. -प्रसाद