Nojoto: Largest Storytelling Platform

ये बाळा जेवलास का? हे विचारायचं ती विसरत नाही... व

ये बाळा जेवलास का?
हे विचारायचं ती विसरत नाही...
विसरलं जरी कोणी कधी
मग आईचं आईपण दिसत नाही..

एकदा नव्हे दहा वेळा
जेवून घे म्हणून थकत नाही..
आई असल्यावर घरी 
 उपाशी कुणी झोपत नाही..

रांधा वाडा उष्टी काढा
तरीही आई काय करत नाही..
खरं म्हणजे तिच्याविना
घरातलं पान ही हालत नाही..

आजवर कधी उपाशी मात्र 
स्वप्नात सुद्धा झोपलो नाही..
समोर सगळं असूनही आज
साधं पोटभर जेवू शकलो नाही..

©गोरक्ष अशोक उंबरकर
  #MothersDay