"माणसाच्या सोईचा देव ....." या सागर काकडे या मित्राच्या कवितासंग्रहाचं मुखपृष्ठ मी केलं होतं. सामाजिक भान जपणारा विद्रोही अंगांचा हा एक चिंतनशील कवी आहे. त्याची कविता माणसाचा तळ ढवळते. आतलं आतलं खोल लिहिताना विचार करायला लावते. दृश्य कवितेतली अदृश्य जाणीव गर्द होते. सागर इतका जुना मित्र असूनही त्यानं माझ्या कवितेचं अक्षरचित्र कर म्हणून हट्ट धरला नाही. आज सवडीने त्याची कविता मागवून घेतली. कामगारांचं भावविश्व ठळक करणारी त्याची ' स्वप्न ' ही कविता आपल्यासाठी.....