पृथ्वीला, कोरून कोरून रस्ते अन चोरून चोरून पाणी काढलं होतं मला कधीच पुरलं नाही, जे ताटात माझ्या वाढलं होतं मग सांगा कुण्या तोंडानं म्हणू, दुष्काळानं भरडलं होतं... आमची गर्दी इतकी झाली, कि नदीचं पात्रच उरलं होतं समदं माहित होतं तरीबी, तिथं मजबुरीनं उभारलं होतं मग सांगा कुण्या तोंडानं म्हणू, घरात पाणी भरलं होतं... डोंगर पोखरून, निसर्ग टोकरून घराचं स्वप्न पहिलं होतं पण, फांदीवर बसून, फांदी तासून सुरक्षित कोण राहिलं होतं...