१४ मे १६५७ रोजी पुरंदर येथे एक शिवतेज जन्मले होते, स्वराज्याच्या विस्तारासाठी शंभूराजे नावाचे अजून एक छत्रपती उदयास आले होते. मृत्युच्या जबड्यात असताना ही ज्याने औरंग्यास मृत्यूचे भय दिले, चाळीस दिवस मरणयातना भोगूनही ज्यांनी आपले धर्म न सोडिले. लहान असतानाच ज्यांच्या डोक्यावरून आईच्या मायेचे छत्र हरवले, तरीही रणांगणावरील पराक्रम आणि राजकारणी डावपेच ज्यांनी आत्मसात केले. वय वर्षे अवघे नऊ तरीही स्वराज्य रक्षणासाठी मैदानात उतरणारे, १२० युद्धे लढून एकही युध्द न हारणारे ऐन तारुण्यात वयाच्या ३२ व्या वर्षी स्वराज्य रक्षणासाठी प्राणाची आहुती देणारे. ऐसे माझे दैवत स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी राजे, पुत्र त्यांचा छावा नाव ज्यांचे छत्रपती शंभूराजे. शुभ संध्या मित्रहो मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज स्वराज्याचे दुसरे छत्रपती स्वराज्यरक्षक श्री.संभाजी महाराज यांचा जन्मदिन. स्वराज्यासाठी प्राणपणाने लढून आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या वीर लढवय्या शंभूराजांचे आज स्मरण करूया. लिहुया काहीतरी प्रेरणादायी, आवेशपूर्ण... आताचा विषय आहे 'शंभूराजे' #शंभूराजे #शंभूराजे1