*घेऊनी सूर हाती* सुरावटी वर थांबलेले आता सूर ही आतुरलेले तुझ्या स्वरांना मिठीत घेणे हेच तर सुरांबराचे देणे ओथंबलेले ते आरोह विसावलेले ते अवरोह त्यांना तू समवेत घेऊनी गावी तू प्रेमाची रागिनी त्या सुरांवर मी विहरावे शब्दांनी ही हळूच बसावे होऊनी मनाची शब्दपाखरे संगीत वन ते फुलावे हळूच यावा स्वर हा शांतवर्णी देहाची या व्हावी तरणी सूर लाटेवर स्वार व्हावे मधूर गीतांच्या गावी जावे सूर तालाच्या भेटीमध्ये मी ताल नी तू सूर व्हावे पल्लवी फडणीस,भोर✍