नजरेच्या अगदी जवळ धडधडत्या काळजात तु असावा माझ्या हसण्यात जीव तुझा गुंतलेला असावा लय येतील दुःखावणारे तु सुखाचा सागर असावा. बस्स झालंय प्रश्नाशी झुंज आता तुझ्या नजरेत गुंतायचंय आयुष्य जिवंत होऊन नव्याने जगायचंय रोजंच असती जीवाची वणवण जरा थांबायचंय लय भटकले खुपदा एकटी राहिले ओठांवर हसु ठेवुन मनाने खुप सुखले दुसर्यांचा विचार करत लय दा मनाने हारले आता या समंद्यांना सांगायचंय मला ही तुझ्या सोबत सुखानं जगाचंय लोकं तर असतेतच स्वार्थी त्यातली मी ही असेल . मला तुझ्यात निस्वार्थ बघाचंय तुझ्या प्रेमांत किती जिव्हाळा आहे हे स्वतःला समजावयचंय। नकोय खोटी आशा मला तुझं खरंपण बघायचंय तुझ्या नजरेत कैद होऊन हाथ तुझा आयुष्यभर धरायचंय प्रेमानं जग जगत मला जगण्यात प्रेम हवंय ते फक्त माझं असावं हक्काचं नातं असावं स्वप्न तर सगळेच बघतेत तुला भेटण्याची मी ही त्यातलीच आहे फक्त आता तु हवा दुरावा संपण्यासाठी तुच हवा..! मन थकुन पुन्हा ताजं होतं जेव्हा शब्दचं तुला लिहुन तृप्त होतेत। ©SUREKHA THORAT #waitingsomeonespecial #waiting