नाटक एक मेंढी तेवढी ढकलावयाला पाहिजे, मागुती जातात बाकी आकलाया पाहिजे! केवढे अन्याय अत्याचार होती सारखे रक्त आता जाणत्यांचे सळसळाया पाहिजे! दूध प्याले वाघिणीचे पुस्तकांना वाचुनी भुंकणे नाही बरे बा गुरगुराया पाहिजे! बाप थकला मायची तब्येत नाही ती बरी, श्रावणासम लेकरांनी त्या झुराया पाहिजे! घेत जा अन् घेत जा तू घ्यायचे ते मोकळे घे वसाही दानतीचा द्यावयाला पाहिजे! केवढ्या शाळा इथे अन् शिक्षणाची पंढरी लोपले संस्कार जे शिकवावयाला पाहिजे! नाटकाचे अंक नाही नाट्य व्हावे नेटके लाभला जो रोल तो वठवावयाला पाहिजे! जयराम धोंगडे, नांदेड (९४२२५५३३६९) ©Jairam Dhongade #paper