आभाळात एवढा चांदणसडा असताना तुला मात्र माझा चेहरा पहावसा वाटतो, एवढा असताना चंदेरी प्रकाश पण तुला मात्र माझ्या डोळ्यात दिसते चमकणारे आकाश असताना हवेत इतका शितल गारवा,तू मात्र घेत असतो माझ्या स्पर्श्याचा अलगद विसावा चंद्र आणि चांदण्यांचा पाठशिवणीचा खेळ चालतो,तू मात्र माझ्याशी लपाछपी खेळतो तुला मी कधीच नाही दिसत मी जशी आहे तशी मला पाहतच नाही ,तूला माझ्यातच हसरे चांदणे दिसते,आणि मी ही माझ्या हातांच्या कवाडाआडून लडिवाळ लाजते पल्लवी फडणीस ,भोर✍