साथ तुझी नकळत पडलो प्रेमात तुझ्या नकळत गुंतत गेलो तुझ्यात भास हि तुझे होऊ लागले हरवून जाई तुझ्या स्वप्नात चंद्र चांदण्यात पाहतो तुला गंध मातीचा भासतो तुझा स्पर्श वाऱ्याचा जाणवतो तुझा फुलपाखरापरी चंचल स्वभाव तुझा सतत विचार तुझे, सतत आठवणी तुझ्या स्वप्ने ही माझी, मात्र त्यात चेहरा तुझा ओढ लागली तुझी माझ्या मनाला करमत ही नाही तुझ्याविना बावऱ्या जीवाला कस सांगू मी तुला, विश्वास तरी ठेवशिल का...? माझ्या प्रेमाला होकार तू देशील का...? गुपित हे प्रेमाचं आज सांगतोय मी तुला देशील का साथ तुझी आयुष्य भरासाठी मला... - रोहन पवार i wrote this poem for my first love.