आई... कितीही काम केले तरी लवकर उरकत नसते, म्हणूनच नेहमीच तिची घाई असते. सकाळी उठ रे मेल्या पासून रात्री झोप रे बाळा पर्यंत, तिच्या प्रेमाची वेगवेगळी शैली असते. प्रेमाने जितकी वागते तितकीच रागीट ही राहते, पण काहीही म्हणा,आई ची गोष्टच लई न्यारी असते. नुसतच उंडगत राहतो,पैसा तरी कुठून येतो, बाबांच्या विचारात नेहमीच हा प्रश्न राहतो. आई ची कृपा असते ती,की लक्ष्मी आपल्याजवळ राहते, घर खर्चाला असलेल्या पैशातून,शिल्लक ठेऊन ती आपल्याला देते. होता वाद बाबांशी,आपल्या चुका ती पाठीशी ती घालते, बाबा शेवटी गप्प,आई समोर त्यांची काहीच न चालते. किती ही अवगुणी असले मुल,तरी त्याचे गुणगान गात राहते, आई ती आई असते,जी मुलाच्या प्रत्येक चुकांवर पांघरून घालते. आई... #yqmarathi #मराठीलेखणी #आई #yqtaai #माझीआई #आईचेकाळीज #आईची_माया कितीही काम केले तरी लवकर उरकत नसते, म्हणूनच नेहमीच तिची घाई असते. सकाळी उठ रे मेल्या पासून रात्री झोप रे बाळा पर्यंत, तिच्या प्रेमाची वेगवेगळी शैली असते. प्रेमाने जितकी वागते तितकीच रागीट ही राहते, पण काहीही म्हणा,आई ची गोष्टच लई न्यारी असते.