Nojoto: Largest Storytelling Platform

#माझं एक आयुष्यातलं अर्धवट राहिलेलं पत्र....!!! मा

#माझं एक आयुष्यातलं अर्धवट राहिलेलं पत्र....!!!
माझं एक आयुष्यातलं अर्धवट राहीलेलं पत्र..पोहचेल का कधी तुमच्यापर्यंत ??..
किती सहजपणे भुतकाळरूपी नदी प्रवाहात वाहुन गेलेल्या काळात
रमण्याची शक्ती आपल्याला देवानं दिली आहे नं..??
त्याच जुन्या आठवणीत पुन्हा पुन्हा आपण जगतो,रडतो,हसतो अन् नव्याने जगत असतो....
पण त्यावेळी जिवंत असतो का आपण....? मुळात जगणं अन् जिवंत असणं
ह्यातला फरक ओळखायच्या भानगडीतच पडत नसतो...बस चाललेय नं तर चालू द्या..
याच विचारात आपण बरेचदा आयुष्य जगणं कायम ठेवत असतो..पण नाही हं..
मी जगताना तर फक्त मी गमावलेल्या माझ्या सर्व माणसांच्या आठवणीत जिवंत होतो.
मग मी मला आयुष्यात जगण्यासाठीचे बाकीचे क्षण वाया गेले असं समजु का..???
तेच क्षण पुन्हा कधीतरी डोळे मिटण्याआधी एकदा तरी दिसतील का ??..
भेटतील का ??..बोलतील का ??.. ह्या अन् अशा कित्येक प्रश्नचिन्हासोबत रडत कन्हत
काढलेल्या आयुष्याचं मी काय आणि कसं गणित मांडायचं...??
खूप काही राहुन गेलंय..
माझं माझ्या त्या खास असलेल्या सगळ्याच लोकांशी बोलणं..
माझी कुणाशी तरी ती अल्लड बालिश मस्ती अन् कुणावर असंच रुसणं रागवणं..
हजार चेहऱ्यातुन कुणा एकालाच माझ्या अस्तित्वाच्या आरशात बघणं अन्
ते माझं असं बघताना चारचौघात अडखळणं..
सगळंच तर राहुन गेलंय ना..??
मला असं वाटतंय की बहुतेक खरंच जिवंतपणी माझं जगणंच राहुन गेलंय....
पण आता ना ती लोकं आहेत...ना तो त्यांच्या बरोबरचा घालवलेला बरा वाईट काळ....
जन्माला येताना रित्या हाताने आलो अन् आता
आयुष्याचा अस्त होत असताना सुद्धा
मी रित्या ओंजळीनेच जातोय....
खंत मनी हीच राहील...
माझं एक आयुष्यातलं अर्धवट
राहिलेलं पत्र..
पोहोचेल का कधी तुमच्यापर्यंत..??
@शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #माझं_आयुष्य