आवस ची ती रात काळी कानात माझ्या गुज सांगते, म्हणे हरवला तिचा चंद्र कोठे मज शोधुन देण्याचे मागणे मागते... नियतीचेच जणु अखंड चक्र ते अमावस्येला चंद्राचे अस्तित्व नसते, म्हणुनच की काय त्या अमावस्येला त्याला ग्रहणाचे वेध ही कधी लागत नसते... मिलन अशक्य जरी,शोधणे प्रीत तिची शोधण्यातच तीची ती अवघी रात सरते, आज ही वेडी अमावस्या ती त्या चंद्राला...फक्त...एकदा पाहण्यास झुरते..... #अमावस्या