अश्या या पावसामध्ये तू स्वैर भैर पळावे, तुझ्या मागे पळताना मी पूर्ण पाण्याने चिंब भिजावे, वाढलेला पाऊस बघून आपण एकत्र झाडा खाली थांबावे, आभाळ जसे घट्ट दाटून येतात तसे, तू विजांचा कडकडाट बघून मला दाटून घट्ट मिठी मारावे, तुला माझ्या इतक्या जवळ आलेले बघून, मला माझ्या हृदयाचे ठोके, या चाललेल्या वादळा समोर मोठे वाटावे, मी स्वतः ला कसे तरी सावरत, तुझा हाथ धरून जवळ असलेल्या चहा च्या छोट्याश्या टपरी वर न्यावे, आणि आपण दोघे असताना सुधा, एकच चहा चा कप घेऊन दोघांनी तो एकत्र घ्यावे, असे सुंदर स्वप्न रेखाटत असताना, हळूच आई ने यावे, आणि मला झोपेतून उठव्हाव्हे. ©Tushar Thackeray #joke #tunedtusharthackeray #marathi #InternationalTeaDay