काही दिवसांपूर्वी आईकुशीतल्या बालपणीचं, माझ्या साऱ्या आठवणींचं.. कविता आणि चारोळीचं, माझ्या मनाच्या आरोळींचं.. एक पुस्तक, वारा आभाळात घेऊन गेला.. आभाळ ते वाचतांना एक एक ढग मनभरून रडतोय.. अन सारे जण म्हणताय सध्या पाऊस खूप पडतोय...! अंतरीचा वणवा अंतरात तसाच धगधगता जळतोय..; अन सारे जण म्हणताय सध्या पाऊस खूप पडतोय..! -शिवा IG | @ek_kavimn_Shiva_Patil_007