पर्जन्यदेवता नमो पर्जन्यदेवता नमो दयासागरा लक्ष करांनी वृष्टी करी येऊ दे महापूरा थांब म्हणणार नाही मनसोक्त पडून घे पण पाण्याविना आम्हा मारू नको रे रोपे तहानेने सारी बघ व्याकूळ झाली का सांग दुष्काळाची ही पाळी आणली तृणअंकुरांचा काय झाला गुन्हा का रे फुटत नाही आज तुला पान्हा पाने पाने तहानेने बघ रे सुकली ममतेची भीक मागूनी थकली आता तरी फुटू दे प्रेमाचा झरा नमो पर्जन्यदेवता नमो दयासागरा नमो पर्जन्यदेवता