Nojoto: Largest Storytelling Platform

सणाचा आनंद वाढवणारी तयारी दिवाळी जवळ येत होती, त

 सणाचा आनंद वाढवणारी तयारी

दिवाळी जवळ येत होती, तशी रमाची कामाची गडबड चालू झाली.स्वतःच्या घरामधली साफसफाई आणि जिथे जिथे कामाला जाते ,धुणं भांड्यांसाठी, तिथल्या घरांची ही साफसफाई कामाचा अगदी पिट्या पडत होता, पण हे सगळं काम करतानाही, ती खूप आनंदी होती. यंदाच्या दिवाळीत थोडे-थोडे करून, तिने घरामध्ये मिक्सर घेण्यासाठी पैसे जमवले होते .
जिथे जिथे काम करायची ,तिथे तिथे तिने त्या मालकिणीच्या घरचे मिक्सर बघितले होते ,आणि तिला हि आपल्या घरी असा  मिक्सर हवा असे, वाटत होते. खेडेगावातून नवऱ्यासोबत शहरात आलेली रमा ,या असल्या सुखसोयी ही तिने गावी पाहिल्यास नव्हत्या आणि सासरीही. दोघांच्या मेहनतीने हातातोंडाची गाठ पडत होती मग सुखसोयी च्या वस्तू कुठून घेणार. 
गावी म्हातार्‍या सासू-सासऱ्यांना ही थोडे पैसे पाठवण्याची जबाबदारी दोघांवर होतीच. रमाचा नवरा राघव निर्व्यसनी होता ,याचे रमाला सुख होतं त्यामुळे तिला संसार करताना त्याला साथ देणे सुखकर वाटायचे. 
घराजवळच्या दुकानात तीन हजाराचा मिक्सर तिने पाहून ठेवला होता. दरमहा जमलेले दीड हजार रुपये आणि मिळणारा बोनस यातून तिला मिक्सर घेणे सहज शक्य होणार होतं .
दरवर्षी अशी पैसे जमवून रमा घरात एकेक वस्तू घेत असे. घरा बरोबरच गावीही सासू-सासरे वापरू शकतील अशा काही वस्तू ती आवर्जून घ्यायची आणि आणि पाठवायची त्यांनाही आपल्या सुनेचं खूप कौतुक होतं .

sandyjournalist7382

sandy

New Creator