Nojoto: Largest Storytelling Platform

पाउस चहा आणि ती.... पाउस चहा आणि ती यांचा संगमच वे

पाउस चहा आणि ती....
पाउस चहा आणि ती यांचा संगमच वेगळा काही..
चहा चा घोट घेत पावसाला न्याहळण्याचा तिचा आनंदच वेगळा काही...

पाऊस आल्यावर तो पाहिल्याशिवाय काय तिला राहवत नाही...
पाऊस पाहायला जाताना चहाचा कप घेऊन जायला मात्र ती विसरत नाही...

धो धो बरसणारा पाऊस पाहून तिला काहीच करावेसे वाटत नाही...
बरसणाऱ्या पावसाच्या धारा पाहत चहा पित पित त्यामधे हरवून गेल्या शिवाय तिला जमत नाही...

पावसाच्या दरवळनाऱ्या मातीचा सुगंध काही केल्या मनातून जात नाही ...
दरवळनाऱ्या मातीच्या सुगंधा बरोबर तिने केलेल्या मसालेदार चहाचा सुवास काही केल्या पाठलाग सोडत नाही...

धुवाधार पावसात तिचे मन कसे ओलेचिंब भिजुन जाई...
पाऊस बघून चहा पिताना तिला पावसात भिजल्याचा आभास होई...

असा हा पाऊस चहा आणि ती हे गणितच कधी कोणाला कळले नाही ...हे गणितच कधी कोणाला कळले नाही ...

शब्द स्वतः चे सोनाली..

©Sucheta Turde पाऊस चहा आणि ती... शब्द स्वतः चे सोनाली

#rain