ज्यांनी कुठलंही हत्यार न उचलता पिटाळून लावलं इंग्रजांना, असे आमचे राष्ट्रपिता, त्यांच्या लोकांना घालायला कपडे नव्हते , म्हणून स्वतः ही फक्त धोतर नसणारे आमचे राष्ट्रपिता, स्वावलंबी जीवन जगायला शिकवणारे आमचे राष्ट्रपिता, अश्या राष्ट्रपित्याला माझा त्रिवार वंदन....... सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आज राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादुर शास्त्री यांची जयंती आहे. आजचा विषय आहे राष्ट्रपिता.. #राष्ट्रपिता चला तर मग लिहुया. लिहीत राहा. मोहनदास करमचंद गांधी (ऑक्टोबर २, इ.स. १८६९ - जानेवारी ३०, इ.स. १९४८) हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते आणि तत्त्वज्ञ होते. महात्मा गांधी या नावाने ते ओळखले जातात. अहिंसात्मक असहकार आंदोलनांनी गांधींनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. अहिंसात्मक मार्गांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी संपूर्ण जगाला प्रेरित केल