कितीदा नव्याने ..✍️ _कितीदा नव्याने स्वप्न.. तुझे मी बघावे ! बंद डोळ्यांत ..तुला पापणी ही बघावे .. बंद डोळ्यात तुला सांग . ! कसा मी जपू रे पापणी ही उघडता भीती विरहाची उरी रे .. मी मनाशी जपावे किती काळ तुझे सप्न प्रतिक्षा मिटे ना न घडे का ? प्रत्यक्ष नयनांशी भेट . .! प्रतिक्षेत तुझ्या . . नयन हे , दूर पाही . न जाणतो मी कधी तुझी भेट होई ! कितीदा नव्याने तुला अंतरी स्मरावे प्रत्ययी न येता स्वतः शी मी हरावे . . क्षण हा का . . ? भेटी आधीच विरह भासे , वेदनांना ही जणू हुंदके दाटे . . न जाणता जाणतो तुला मी मज भेटी साठी आतुरता तुला ही . . ; किती वेळ स्वप्नांत खेळशील तू . . किती काळ एकान्त मला देशील तू . . किती काळ तुला मी स्मरावे ? तुझ्याविना का मज प्रत्यय उरावे ! कितीदा नव्याने ..पुन्हा तुझे नाव ओठी आतुरता पुन्हा ही तुझ्या भेटीसाठी कितीदा स्वप्न मी तुझ्या मिलनाची बघावे . . स्वप्नातून समक्ष नयानांशी तु यावे ____ 📖_ ध. वि . गोपतवार_✍️ ©Dharmendra Gopatwar #कितीदा नव्याने