*ते कोल्हापूर गाव कुठे गेले*। दुःखात नांदणारे , आज ते रंक अन् राव कुठे गेले। नद्यांचे रौद्र रूप क्षणी, ते कोल्हापूर गाव कुठे गेले|। राधानगरी तालुका असे, देणगी ही निसर्गाची|। महालक्ष्मी हे देवस्थान , रुपे दिसेही स्वर्गाची। वाट वळणाची , दाटी वनाची, सारे हे ‘ प्रभाव ' कुठे गेले नद्यांचे रौद्र रूप क्षणी, ते कोल्हापूर गाव कुठे गेले|। राधानगरी धरणादुरी, दिसे जागा बरी, तिथे घरे बांधिली पूरग्रस्त होता, जीवन कंठिता , सुखे ही शोधिली। मॄत्यूचे थैमान , होई बेभान, कैक देहांची झाली माती। बायको, मुले, बहिण - भाऊ मायेची तुटली अतूट नाती। कंठ दाटूनी , धीर सुटला , काळजाचे हे घाव कुठे गेले। नद्यांचे रौद्र रूप क्षणी, ते कोल्हापूर गाव कुठे गेले । बघता बघता निसर्ग कोपला, निसर्गाचा आंधळा धड़ा। होत्याचे नव्हते झाले, ढळता ढळता डोंगरकडा। गांव हे शोधता , दुःख हे भोगता देहाचे ठांव कुठे गेले नद्यांचे रौद्र रूप क्षणी, ते कोल्हापूर गाव कुठे गेले|। ‘आदित्य ’करतो प्रार्थना , हे मेघराजा घे विसावा फार झाले , सुकलेल्या माळराणी , ज्या ठिकाणी दुष्काळाचे वार झाले। ✍🏻- *आदित्य सिताराम पारखे। विक्रोळी पार्क साईट मुंबई*