"वाट घराकडची" --(geet) दमला होता फिरून तो संध्या आता झाली होती रणावणातल्या आकाशाची भेट त्याला झाली होती भल्या पहाटे वाट कामाची त्याला दिसली होती पहाटेच्या वेळी चिमण्यांची चिवचिव होती चिमण्यांचा जल्लोष त्याला स्वप्न पहाटेची दाखवत होती उडून परत घराकडे जाताना पिल्ले दिसत होती पिल्लांसाठी चोचीमध्ये काहीतरी नेत होती धडपड याच्या जीवनाची तशीच काहीतरी सुरू होती दगदग त्या जीवनाची लेकरांसाठी सुरू होती परततांना त्याला वाट घराकडची दिसत होती चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरचे स्वप्न त्याला कळत होती प्रवासातली वाट त्याला खेचून पुन्हा नेत होती परत येताना रोज त्याला वाट घराकडची दिसत होती....