Nojoto: Largest Storytelling Platform

आठवणीतली!! कोजागिरी!! कोजागिरी म्हणलं की प्रत्येक

 आठवणीतली!! कोजागिरी!!

कोजागिरी म्हणलं की प्रत्येकाला  आठवतं गच्चीवरील  जागरण ,भेळ,मसाला दुध आणि विविध गाण्यांचे  कार्यक्रम त्यांत चंद्र, चांदण, आकाश,पौर्णिमा ह्या वर आधारित सुमधुर गाणी.
 कोजागरी पौर्णिमा , शरद पौर्णिमा किंवा नवान्न पौर्णिमा ही शरद ऋतूतील आश्विन महिन्यात येते. कृषी संस्कृतीत ह्या दिवसाला विशेष महत्त्व आहे.   नवान्न पौर्णिमा या दिवशी शेतात उगवलेलं नवीन धान्य प्रथम देवाला अर्पण करून मगच त्याची खीर केली जाते.  ह्या दिवशी असं म्हणतात की  साक्षात लक्ष्मीदेवी पृथ्वीवर उतरते आणि मध्यरात्री (संस्कृतमध्ये) 'को जागर्ति' (म्हणजे 'कोण जागत आहे') असे म्हणत  पृथ्वीतलावर फेरी मारते.लक्ष्मी फिरत असताना जे लोक जागे राहतात त्यांच्या वर लक्ष्मीकृपा होते असे म्हणतात.  या दिवशी दूध आटवून त्यात केशर, पिस्ते, बदाम, चारोळी, वेलदोडे, जायफळ, साखर वगैरे गोष्टी घालून, लक्ष्मीदेवीला नैवेद्य दाखविला जातो. दुधात मध्यरात्री पूर्ण चंद्राची किरणे पडू देतात आणि मग ते दूध प्राशन केले जाते. गेली चार पाच वर्ष आम्ही मित्र मैत्रीणी  आमच्या बंगाली मैत्रीणीकडे कोजागिरीला जातो.कोजागरी पौर्णिमेला बंगाली लोक लक्ष्मीची पुजा करतात त्यांला 'लोख्खी पुजो' असे म्हणतात. या दिवशीच्या लोख्खी पूजेमध्ये बंगाली लोक शहाळी वा ताजे नारळ वापरतात.ही पूजा स्त्रिया  संध्याकाळी करतात.  दारावर तोरण लावले जाते.घराबाहेर तांदूळाच्या पिठीने सुबक रांगोळी काढली  जाते. घरात लक्ष्मीची पाउलें काढली जातात.
 एका चौरंगावर लक्ष्मीची आणि गणपतीची मूर्ती स्थापन केली जाते. एका कलशावर शहाळे किंवा नारळ ठेवला जातो. कलशावर स्वस्तिक चिन्ह रेखांकित केले जाते. आपल्या नेहमीसारखी पंचामृती पुजेची तयारी केली जाते . ह्या पुजेमध्ये गव्हाच्या लोंब्या ठेवतात. प्रथम गणपतीची पुजा केली जाते मग लक्ष्मी मातेची पुजा केली जाते फुले अर्पण केली जातात. धुप दिप लावून साग्रसंगीत पुजा केली जाते. त्यांचा बंगालीतुन पाठ  म्हटला जातो. बंगाली भाषा इतकी गोड की तो ऐकायला अतिशय छान वाटते. मग आरती केली जाते. आम्ही विविध  भाषिक  सर्वजणी मराठी, हिंदी, गुजराथी अशा  देवीच्या वेगवेगळ्या आरत्या म्हणतो. वातावरण एकदम प्रसन्न होऊन जाते.प्रसाद दाखवताना पाच फळं मिठाई ,बत्तासा,पोहे यांचा नैवेद्य दाखवला जातो. पूजा संपल्यावर नैवेद्याची थाळी किंवा भोग म्हणतात तो दाखवला जातो .या दिवशी बंगाली स्त्रिया त्यांची पांढरी लाल साडी नेसतात. भांगात सिंदुर भरतात. पुजा झाली आलेल्या सर्व स्त्रियांना हळदीकुंकु लावले जाते. गजरा दिला जातो व काहीतरी सौभाग्य वस्तु जसे सिंदूर बायकांना दिला जातो. प्रसाद वाटला जातो. मग सगळ्यांचे अतिशय रुचकर बंगाली पद्धतीचे जेवण होते.
बंगाली भोगामध्येखिचुरी( साजुक तुपात  तांदुळ आणि मुगाची डाळ ,आख्या गरम मसाला घातलेली खिचडी)  बैगुन भाजा ( वांग्याची भजी),टोमॅटो चटणी ह्या मध्ये खजुर, साखर,तिखट मीठ आणि मुख्य म्हणजे  बंगाली विशेष पंचफोडण म्हणजे जीरा, मोहरी,बडीशेप, मैथी दाणे आणि  कलौजी याची फोडणी दिलेली टोमॅटो चटणी .ही खट्टीमिठ्ठी चटणी जबरदस्त लागते.लबरा म्हणजे मिक्स भाजी ह्या भाजीत लाल भोपळा, वांगे,घेवडा कोबी  इ. भाज्या असतात आणि ह्यांला पण पंचफोडणची फोडणी असते.लुची (मैद्याची पांढरी शुभ्र पुरी),आणि    बंगाली विशेष पायश (गोंविदभोग तांदूळाची खीर)  ह्यांत अख्खे तांदुळ धुवुन तुप लावून ठेवतात मग  दुध आटवून  त्यात तांदुळ मंद आचेवर  शिजवतात. नंतर साखर  वेलची पावडर आणि काजू, बदाम, पिस्ता नी सजवतात.ह्या खिरीची चव जिभेवर दिर्घकाळ रेंगाळत राहते.मंगलमय वातावरण, लक्ष्मीदेवीची पुजा, मैत्रीणींशी जेवून झाल्यावर  हात वाळेपर्यंत चाललेल्या गप्पागोष्टी आणि बंगाली  रुचकर जेवणांनी तृप्त झालेल्या आम्ही सर्वंजण  कोजागिरीची  आतुरतेने वाट पहातो....📝🙏✍️sandy✍️

sandyjournalist7382

sandy

New Creator