आयुष्याला फुलवणारा तू प्रदीर्घ श्वास, सतत सोबतीचा एक आनंददायी आभास, या एकट्या जीवाला घडवणारे, तुम्ही मित्रच आहात खूप खास...😍😎🕺 आपली मित्रमंडळीच होती भारी, मस्ती करायचो खूप सारी, पण फिरायचा विचार झाला की, निघायची आपली bunk मारून स्वारी...🏍️🛵🚊 कॉलेजला मध्ये असायची सगळ्यांची संगत, ब्रेक मध्ये लागायची लास्ट बेंचवर पंगत, वहीवर केलेल्या रेषांची वेगळीच होती रंगत, कंटाळा आल्यावर तीच असायची गंमत...〰️〽️➖✖️⭕📉 परीक्षेला हुशार मित्राचे महत्व कळे, notes साठी सगळे मैत्रिणीकडे वळे, यावरूनच मित्रांची पडली होती एक म्हण, वेळेला केळे आणि वनवासाला सिताफळे...👫👬👭 कॉलेजनंतर सगळ्यांवर आली कामाची मखरे, मग भेटण्यासाठी पण आता करायला लागली सगळी नखरे, नव्या मित्रांच्या व कामाच्या सोबतीत, हरवून गेली माझी आवडती पाखरे...🕊️🦅🦉 माझ्या पाखरांनो परत फिरा, आपल्या मैत्रीच्या घरट्यात परत शिरा, माझ्या हातातील बोट पण शोधत आहे, तुमच्यासारखा चमकता हिरा..👉💍💎 Happy Friendship Day Happy Friendship Day #VJ #विज #शब्द_लहरी #मैत्री #Friends #Friendship #MissYouFriends