Nojoto: Largest Storytelling Platform

#माझा नसलेला हक्क.... काल हसत हसत तु म्हणालास की म

#माझा नसलेला हक्क....
काल हसत हसत तु म्हणालास की माझ्यासकट सगळं तुझंच आहे राणी...
सगळं तुझंच आहे असं म्हणालास खरंच सांग ना रे तु....कुठे काय आहे रे माझं......?
कपाळीचं कुंकू मोठ छान कोरून लावते मी नाव तुझंच आहे त्यावर गोंदवलेललं
या आपल्या घर संसारात मेहंदीने भरलेलं पहिलं पाऊल टाकताना व उंबरठ्यावर ओलांडता माप 
नाव तुझंच होतं माझ्या ओठांवरच्या उखाण्यात गुंफलेलं ते अनमोल असं अस्तित्वही तुझंच होतं माझ्या अस्तित्वाशी जोडलेलं....अन् तू म्हणतोस सगळं तुझंच आहे..खरंच सांग ना रे तु....कुठं काय आहे रे माझं......?
सावली बनून तुझी चालताना पावलोपावली सप्तपदी आठवत गळ्यातल्या मंगळसूत्राचा एकेक मणी मजला सदा तुझीच मनमोहक आठवण करून देणारा हो....तुझ्या माझ्या अस्तित्वाला एक करणारा आहेच तो....मंगळसूत्राच्या पहिल्या वाटीतलं कुंकू भाळावर मिरवताना एक झालेला तोच जीव माझा राया तुझ्यातच गुंतलेला मग कुठे काय दिसे रे माझं उरलेलं
अन् तू म्हणतोस सगळं तुझंच आहे खरंच सांग ना रे तु....कुठं काय आहे रे माझं......?
हातभर ल्यायलेली हिरवीगार काकण किणकिणतात व 
माझ्या स्पंदनातून नाव तुझंच उमटत जातं प्रत्येक श्वासासोबत
हो..मी अन् माझं बालपण अन् सोबत बांधून आणलेली ती किंचितशी लावलेली हळद मात्र माझीच हं..
नावाची तुझ्याच होती रे ती..पण जाताना मात्र मीच अंगभर लेवून जाईन एकटी..जोडव्यांची ती अखंड जोडणी सोबत नेताना त्या चिमूटभर हळदीचा तिच्यावरचा माझा हक्कही मी नाही सोडणार..ती माझ्या अस्तित्वाचा भाग असणार..ती तेवढी चिमुटभर हळद..केवळ माझीच..हो..फक्त माझीच असणार..
फिरूनी नव्यानं जन्म घेईन मी तेव्हा सुद्धा तीच तुझ्या नावाची चिमुटभर हळद मी मोठ्या अभिमानानं अंगभर लावणार..तेव्हा सुद्धा ती चिमुटभर हळद तुझ्याच नावाची असणार रे..आणि तरीही काल हसत हसत तु म्हणालास की माझ्यासकट
सगळं तुझंच आहे राणी...सगळं तुझंच आहे असं म्हणालास..
खरंच सांग ना रे तु..कुठं काय आहे रे माझं......?
@शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #स्त्री_जन्मा_तुझी_कहाणी