White तू गजरा माळलेला केसातला मी त्यात गुंतलेला दोरा ग... तू पूर्ण पुस्तक कवितांचे अन् मी कागद कोरा ग... तू श्रावणातला इंद्रधनु मी त्यात कोसळणाऱ्या धारा ग... तू रात गुलाबी चांदण्याची मी त्यातील उनाड वारा ग.. तू चंद्र पौर्णिमेचा त्यात मी लूकलुकणारा तारा ग.. तू साऱ्याचेच उत्तर माझे अन् मी प्रश्नांचा पसारा ग.... ©अरुण मुंढे #love_shayari