Nojoto: Largest Storytelling Platform

काय झालंय मला, माझं मलाच कळत नाही... जिथं तिथं तु

काय झालंय मला, माझं मलाच कळत  नाही...
जिथं तिथं तुझी छबी दिसल्याशिवाय राहत नाही...
दूर असलास तरी मनाभोवतीच घुटमळत असतोस...
डोकावून मला पाहत उगाच गाली हसत असतोस...

काय झालंय मला, माझं मलाच कळत  नाही...
मिटले डोळे तरी पटलांवरी तूच राही...
सतत तुझ्या असण्या-नसण्याचा लपंडाव सुरु असतो...
मनात माझ्या सतत तुझ्याच विचारांचा कल्लोळ असतो...

काय झालंय मला, माझं मलाच कळत  नाही...
तू नसलास जवळ की मला आजकाल कुठंच करमत नाही...
तुही तिकडे कदाचित असाच झुरत असतोस...
मन मारून आपल्या संसारासाठी राबराब राबत असतोस...
~श्रेयाG✍️

©worldofpoetry__ 
  #mainaurtum