#कात_अन_जात त्यादिवशी शेतात सापाने टाकलेली कात दिसली.. वाटलं ही कात टाकतांना त्याला खूप त्रास झाला असेल.. या त्रासातूनच त्याला नवजीवन प्राप्त झाले असावे.. मग उगाच मनात आलं... साप आपली #कात टाकतो.. पण माणूस आपली #जात का टाकत नाही... असे म्हणतात की सापाने कात टाकली की तो अधिक टवटवीत होतो त्याला नवजीवन प्राप्त होते... कधी वाटतं या सापासारखंच माणसाचे जीवन टवटवीत व्हायचे असेल तर माणसाने फक्त एकदाच त्रास सहन करून जात टाकून दिली पाहिजे.. (एक भोळी आशा म्हणा हवं तर).. नाही का?? म्हणता यायला हवं भविष्यात.. मी जात टाकली, मी कात टाकली..! मी कुजक्या समाजाची लाज टाकली..!! ©Śhîl Wâhûłê #Shadow